सेलू : अखिल भारतीय विमा कर्मचारी संघटनेच्या (AMEA) कार्यकारिणीची बैठक येत्या २४ ते २६ जुलै २०२२ कालावधीत रायपूर (छत्तीसगड) येथे आयोजित करण्यात आली आहे.
श्रीराम स्वरूप निरंजनलाल भवन व्हीआयपी रोड, विशालनगर येथे ही बैठक होणार आहे. पुढील अजेंडा हाताळण्यासाठी आयोजित केली जाईल अशी सुचना या द्वारे देण्यात आली आहे,०१०८२०२२ पासून LIC मधील वेतन सुधारण्यासाठी मागण्यांच्या चार्टर वर चर्चा आणखी अंतिम रूप देणे, PSGI कंपन्या मधील वेतन सुधारणेशी संबंधित घडामोडींचा आढावा घेणे आणि कृतीचा योग्य मार्ग तयार करणे, सार्वजनिक क्षेत्रातील विमा उद्योगाच्या संरक्षणासाठी चर्चा करणे आणि धोरणे तयार करणे, संस्थात्मक बाबी आणि अध्यक्षांच्या परवानगीने इतर विषय अजेंड्यावर आहेत. सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष कॉम्रेड व्ही.रमेश, सरचिटणीस कॉम्रेड श्रीकांत मिश्रा पश्चिम क्षेत्र सरचिटणीस कॉम्रेड एच. आय. भट्ट व अध्यक्ष कॉम्रेड ए.जी. डोकपांडे कॉम्रेड राजेश भालेराव, कॉम्रेड शमशोदिन शेख यांनी केले आहे.