टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू : जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिन व खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू येथील नूतन विद्यालयात आयोजित आंतरवर्गीय टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेला शनिवारी (१६ जुलै) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व नूतन विद्यालय क्रीडा विभागातर्फे या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक किरण देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, पी.टी.कपाटे, बाबासाहेब हेलसकर, टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्य चिटणीस गणेश माळवे, प्रशांत नाईक आदींच्या उपस्थितीत झाले. टेनिसव्हॉलीबॉल खेळाचा जागतिक पातळीवर प्रसार व प्रचार होऊन या खेळास शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे. हा खेळ भारतीय असल्यामुळे केंद्रीय मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली आहे. अशी माहिती सोन्नेकर यांनी या वेळी दिली. देशपांडे यांनी खेळाची माहिती देऊन मार्गदर्शन केले. राष्ट्रीय खेळाडू सोमनाथ पोपळे, आयुष्य एडके आदी राष्ट्रीय खेळाडूंचा या वेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रशांत नाईक यांनी केले.

भित्तीपत्रक स्पर्धा

या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी टेनिसव्हॉलीबॉल खेळाच्या माहितीवर आधारित भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटात आहे. प्रथम व व्दितीय विजेत्यांना रोख बक्षीस व पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गणेश माळवे व क्रीडा विभागातर्फे करण्यात आले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!