राणी वाहेगाव शाळेतील पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

परतूर : तालुक्यातील राणी वाहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी ( १८ जुलै) पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी ज्युनिअर ‘आयएएस’ परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडूभाऊ मानवतकर अध्यक्षस्थानी होते. विश्वनाथ मानवतकर, आसाराम आकात, महादेव मानवतकर, राधाकिसन बोबडे, मुख्याध्यापक सीताराम ठोके आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या युगात आपला पाल्य कसा टिकला पाहिजे. त्यासाठी पालकांनी नेमके काय केले पाहिजे. याबाबत अनिता तांगडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, तर शाळेच्या वाटचालीत पालकांनी हिरिरीने सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक ठोके यांनी केले. या वेळी लातूर येथील संस्कार प्रबोधनीतर्फे घेण्यात आलेल्या जुनिअर आयएएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. केंद्रातून प्रथम क्रमांक प्राप्त श्रृती मानवतकर या विद्यार्थिनीचा विशेष प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी के.एस.वानरे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य व सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन कल्पना वानरे यांनी केले. सीताराम ठोके यांनी आभार मानले.

ज्युनिअर आयएएस परीक्षेतील गुणवंत : श्रृती मानवतकर ( केंद्रात प्रथम), रूद्र खंदारे, अनुष्का सराफ, रोहन साबळे, आरोही वाव्हळ, वेदिका आकात, ईश्वरी गुंजकर, भागवत बोबडे, पियुष आकात, अर्जुन दुगाणे, करण होंडे, संभव वंजारे, तेजस मखमले, धनराज दळवे, शैलेश बोबडे, कॄष्णा मानवतकर, वैभव मानवतकर, स्वराज आकात, शिवकन्या वाव्हळ, निकिता लाटे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!