ओबीसी आरक्षणाचा सेलूत जल्लोष

सेलू : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या न्याय निर्णयाचे व शिंदे-फडणवीस सरकारच्या यशस्वी लढ्याचे सेलू शहरातील क्रांती चौक, जिंतूर नाका व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा विजय असो, ओबीसी मोर्चाचा विजय असो, आदी घोषणा देण्यात आल्या. या वेळी महादेव गायके, गणेश नाईकवाडे, विठ्ठल कोकर, भागवत दळवे, कपिल फुलारी, संदीप बोकन, बाळासाहेब काजळे, नागेश ठाकूर, अर्जुन बोरुळ, राजेंद्र सोळंके, प्रशांत ठाकूर, बालासाहेब क्षीरसागर आदीसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!