प्रा.बबन सोनवणे यांना पीएचडी

परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालयातील प्राध्यापक बबन सोनवणे यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून शिक्षणशास्त्र विषयात पीएचडी पदवी संपादन केली आहे. प्राध्यापक सोनवणे यांनी ‘परभणी जिल्ह्यातील पालकांची पाल्यांविषयी शैक्षणिक अपेक्षा, चिंता व अनास्था आणि पाल्याची शैक्षणिक प्रगती – एक अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. हट्टा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एच.कुलकर्णी यांचे त्यांना मार्गर्दशन लाभले. सोनवणे यांचा प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्या डॉ.नीलिमा सिंग, डॉ. रत्नपारखी प्रा.अशोक बोडखे आदींची उपस्थिती होती.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!