पंजाब डख यांना लखुजीराजे जाधव पुरस्कार

परभणी : राज्यभरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज कळविणारे सेलू (जि.परभणी) तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांना लखुजीराजे जाधव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
लखुजीराजे जाधव यांच्या ३९३ व्या स्मृतीदिनानिमित्त सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) येथे सोमवारी, २५ जुलै रोजी आयोजित जाधव कुळाच्या मेळाव्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे यांनी ही माहिती दिली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांनाही या वेळी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे अध्यक्षस्थानी असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून भैय्यासाहेब जाधव, शिवाजीराजे जाधव आदींची उपस्थिती राहणार आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!