गंगाखेड : येथील अनुसयाबाई चौधरी केंद्रीय प्राथमिक शाळेत गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना स्वर फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी बोलतांना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव म्हणाले, “खरे गरजू विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच शिक्षण घेत असतात. त्यामुळे या शाळाही दर्जेदार शिक्षणाची केंद्रे झाल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे”
या वेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत भोसले, आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, साहेबराव चौधरी, केंद्रप्रमुख शिवाजी फड, मुख्याध्यापक सुरेश लटपटे, व्यंकटेश विद्यालयाचे राजेश खाकरे, आर.डी.भोसले, मारोती सातपुते, संयोजक रंजीत शिंदे, सचीन सूर्यवंशी आदींची उपस्थिती उपस्थिती होती.
श्रीकांत सुभाष शितोळे, अलिया सय्यद, दीपक गणेश शिंदे, माऊली गणेश शिंदे, साईराज बालाजी मोरे, सोनपरी कांबळे, शेख शिरीन आदी विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. विविध शालेय उपक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चातून वाहन व्यवस्था करणारे शिक्षक, शिक्षिका दहे यांचे पाहुण्यांनी कौतुक केले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याबद्दल मान्यवरांनी आश्वस्त केले. प्रास्ताविक लटपटे, तर सूत्रसंचालन सुभाष चव्हाण यांनी केले.