सेलू : येथील ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान व ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठानतर्फे शुक्रवार ते शनिवार (२९ जुलै ते २७ ऑगस्ट ) या कालावधीत सेलू (जि.परभणी) येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर सभागृहात श्रावणमासानिमित्त ज्ञानेश्वरी प्रवचने होत आहेत. प्रवचनमालेचे हे अठरावे वर्ष आहे. दररोज रात्री आठ ते नऊ या वेळेत प्रवचने होणार आहेत. संयोजन समितीने ही माहिती दिली आहे.
२९ जुलै रोजी पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांच्या प्रवचनाने प्रवचनमालेचा आरंभ होत आहे. शंतनू पाठक – ३० जुलै, अर्जुन होलिया – ३१ जुलै, चंद्रकांत सातोनकर – १ ऑगस्ट, भगवान महाराज सेलूकर – २ ऑगस्ट, सुनील महाराज आष्टीकर -३ ऑगस्ट, महादेव महाराज ईरळदकर – ४ ऑगस्ट, विजय महाराज – ५ ऑगस्ट, जयंतराव धानोरकर – ६ ऑगस्ट, रत्नाकर देशमुख – ७ ऑगस्ट, शंकर आजेगावकर – ८ ऑगस्ट, शिवाजी महाराज खवणे – ९ ऑगस्ट, प्रभाकर महाराज नित्रुडकर – १० ऑगस्ट,
अशोक महाराज आकात – ११ ऑगस्ट, लक्ष्मीबाई थटवले – १२ ऑगस्ट, विष्णू महाराज लाटे – १३ ऑगस्ट, शुभांगीताई देशमुख – १४ ऑगस्ट, प्रशांत महाराज खानापूरकर – १५ ऑगस्ट, ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी – १६ ऑगस्ट, शिवेंद्र चैतन्य महाराज – १७ ऑगस्ट, लक्ष्मीप्रसाद पटवारी – १८ ऑगस्ट, अनंत महाराज पावडे – १९ ऑगस्ट, श्रीहरी महाराज पितळे – २० ऑगस्ट, नामदेव महाराज चारठाणकर – २१ ऑगस्ट, डॉ.सचिन परब – २२ ऑगस्ट, प्रणव महाराज पटवारी – २३ ऑगस्ट, अंबादासराव पावडे – २४ ऑगस्ट, डॉ.विनायकराव कोठेकर – २५ ऑगस्ट, विठ्ठल महाराज सायखेडकर -२६ ऑगस्ट, तर २७ ऑगस्ट रोजी मनिषानंद पुरी महाराज यांच्या प्रवचनाने सांगता होणार आहे. श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
महिनाभर चिंतनाचा जागर…
२१ ते २७ ऑगस्ट या कालावधीत गुलाबराव लहानेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी सात ते दहा या वेळेत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण होणार आहे. २९ जुलै ते २७ ऑगस्टपर्यंत चालणार्या या प्रवचनमालेत स्थानिकांसह राज्यभरातील ज्ञानेश्वरीचे अभ्यासक चिंतनाचा जागर घालणार आहेत.
| आज |
शुक्रवार, २९ जुलै २०२२, वेळ : रात्री ८ ते ९ प्रवचनकार : हभप पुरुषोत्तम महाराज वालूरकर, सेलू
youtube लिंक : https://www.youtube.com/c/ज्ञानेश्वरीआराधनाप्रतिष्ठान