सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संत गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या एकाहून एक सरस आणि अवीट गोडी निर्माण करणार्या रचना ‘संतवाणी’ या कार्यक्रमात सादर करीत रसिकांची मने जिंकली.
शाळेच्या राजेंद्र गिल्डा सभागृहात शुक्रवारी (२९ जुलै) सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, दत्तराव पावडे, अजीजखाँ पठाण, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक के.के. देशपांडे, डी.डी.सोन्नेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. अजि सोनियाचा दिनु, आम्हा घरी धन, अरे कृष्णा, अरे कान्हा, अवघे गर्जे पंढरपूर, नाम गाऊ, नाम ध्याउ, अगा वैकुंठीच्या राया, निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी आदी रचनांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.
मानसी दलाल, वैष्णवी पिंपळगांवकर, अथर्व तोडकर, दर्शना जोशी, अद्वैत पाटील, आर्या घाडगे, समृद्धी राखे, श्रृती पांडव, प्रज्योत पांचाळ, वरद दलाल आदींनी अभंग, गवळणी सादर केल्या. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांच्या भैरवीने सांगता झाली. तबल्यावर चैतन्य खवणे, हार्मोनियम, सिंथेसायझर अभिजीत गजमल, मृदंग निरंजन वाघ, माऊली खवणे, आरुष शेळके, श्रीनिवास देवकर आदींनी साथसंगत केली. प्रारंभी श्री विठ्ठल प्रतिमेचे पूजन झाले. दत्तराव पावडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी वरद दलाल या गायक कलाकाराचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संतोष पाटील, सूत्रसंचालन अतुल पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी गिरीश दीक्षित, यशवंत चारठाणकर, हेमलता देशमुख, सुरेखा रामदासी, डॉ.विलास मोरे, रवि मुळावेकर, प्रकाश काळबांडे, तुकाराम मगर आदींसह शिक्षक, पालकांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी संयोजक सच्चिदानंद डाखोरे, फुलसिंग गावीत, काशीनाथ पल्लेवाड, केशव डहाळे, विलास अवचार, अरुण रामपूरकर आदींनी परिश्रम घेतले.