मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त सेलूत वृक्षारोपण

परभणी : राज्याचे माजी वनमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील आर्य वैश्य महासभा व मित्रमंडळातर्फे खाणीचा मारुती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी आर्य वैश्य महासभेचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष माधवअण्णा लोकुलवार, जिल्हा सहकोषाध्यक्ष मोहन कोत्तावार , जिल्हा सदस्य शशिकांत मालशेटवार, गजानन फुटाणे, प्रा.संजय कोटलवार, नागनाथ कलकोटे, ज्ञानेश्वर फुटाणे, ज्ञानेश्वर राजकोंडावार, श्रीसाई गादेवार, गोविंद दाचावार, प्रा.वजीर, प्रा जगताप आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!