लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जिंतूर राष्ट्रवादीतर्फे अभिवादन

जिंतूर : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम सोमवारी (एक ऑगस्ट) आयोजित करण्यात आला होता. या वेळी राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षाताई भांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, नगरसेवक मनोहर डोईफोडे, शाहेद बेग मिर्झा, दत्तराव काळे, चंद्रकांत बहिरट, संजय उर्फ बंटी निकाळजे ,अहमद बागमान, शेख इस्माईल, उस्मान पठाण, मकसूद पठाण, महिला तालुकाध्यक्ष मनिषाताई केंद्रे आशाताई खिल्लारे, हरभरेताई, अनिल मोहिते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!