दुर्गा,अंजली, करण,अश्विनी विजेते

सेलू, दि.१ (प्रतिनिधी) : येथील न्यू हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक धनंजय भागवत होते. संजय डांगरे, प्रा संतोष कुलकर्णी, रामेश्वर गाडेकर, परीक्षक गणेश गुध्दे, प्रनयना तेलगोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम – दुर्गा मगर, द्वितीय – अंजली नाटकर, तर तृतीय – करण झोटे व अश्विनी रणखांबे या विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रा.संतोष कुलकर्णी, सूत्रसंचालन सचिन खरात, तर तेलगोटे यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!