सेलू, दि.१ (प्रतिनिधी) : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हेमंतनगरातील दीडशे कष्टकरी, कामगार महिला; तसेच नगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा साडी व भेटवस्तू देऊन सोमवारी (एक ऑगस्ट) सत्कार करण्यात आला.
डॉ.अनिकेत जोगदंड मित्र मंडळ, जयंती उत्सव समिती, डॉ.अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट हेल्थ अँड रिसर्च सेंटर, सेलू यांच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. माजी नगराध्यक्ष पवन आडळकर अध्यक्षस्थानी होते. संयोजक डॉ. अनिकेत जोगदंड, विनोद तरटे, कॉम्रेड बाबूभाई, संजय धापसे, प्रशांत ठाकूर, अंभोरे यांची उपस्थिती होती. या वेळी अण्णाभाऊ साठे यांच्या थोर कार्याबद्दल आडळकर यांनी माहिती दिली. आडळकर यांच्या कार्यकाळात शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्णत्वास गेले, असे अंभोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला योगेश कुलकर्णी, दिलावर शेख, नरसिंग हरणे, दिलीप अवचार, शेखर कथले इम्तियाजभाई, प्रदीप पवार, मोहन समुंद्रे, सुनील गायकवाड, सुनील अंभोरे, ऋषी अंभोरे, अजिंक्य अंभोरे, संतोष वाघमारे, सुरेश अवचार, शुभम अंभोरे, गणेश रणखंबे, सचिन थोरात, संजय अंभोरे, अशोक शेवाळे, संदीप खणपटे, संतोष मुजमुले, मच्छिंद्र पाटोळे, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.