चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगरपरिषद आणि नूतन विद्यालय यांच्यावतीने शनिवारी (सहा ऑगस्ट ) शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पहिली ते आठवी आणि नववी ते बारावी, असे दोन गट होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारतीय स्वातंत्र्य लढा, भारत : एक महासत्ता या विषयावर चित्र काढण्यात स्पर्धक दंग झाले. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे छान नियोजन करण्यात आले होते.

तहसीलदार दिनेश झांपले यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक के.के.देशपांडे, स्पर्धा समन्वय संयोजक आर.डी.कटारे, सुनीता काळे, रामराव मैफळ यांची उपस्थिती उत्साहवर्धक होती. शालेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या कलेतून जागृत केला, असे प्रतिपादन तहसीलदार दिनेश झांपले यांनी या वेळी बोलताना केले.

कलाशिक्षक सुनील मोरे, फुलसिंग गावीत, गजानन साळवे, हिरे, सय्यद, गीते, अन्सारी, साखरे, कीर्ती राऊत, वाटुरे, गायकवाड, देशमुख, खारकर, अरविंद अंबेकर, सुनील राठोड, प्रशांत टकले, अनिता काळे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड आदींनी संयोजनात योगदान दिले.

चित्रकलेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जागृत करण्याचा शालेय विद्यार्थ्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

– दिनेश झांपले, तहसीलदार, सेलू 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!