परभणी : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील देऊळगाव गात जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक अशोक रामराव कुंभार यांना नाशिक येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ११ सप्टेंबर रोजी या पुरस्काराने कुंभार यांना गौरविण्यात येणार आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेकविध पुरस्कारांनी यापूर्वीच कुंभार यांना गौरविण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्काराबद्दल कुंभार यांचे अभिनंदन होत आहे.