परभणी : सेलू तालुक्यातील हदगाव (पावडे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घनवन उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासोबत तीनशे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी तीनशे वृक्षांचे रोपण केले.
या वेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत, गजानन वाघमारे, मुख्याध्यापक इंगळे, अंबादास पावडे आदींची उपस्थिती होती.
इयता तिसरीच्या चिमुकल्यांनी स्वागत गीत गायले. अंबादास पावडे व पथकाने बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृतीपर गीत सादर केले. ज्ञानेश्वरी मगर हीने मनोगत व्यक्त केले. भारतमातेची वेशभूषा साकारणार्या प्रगती पावडेचे उपस्थितांनी कौतुक केले. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हदगाव खुर्द व केमापूर शाळेचे सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले. रक्तदान उपक्रमाबद्दल डासाळा शाळेचे मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन शेख मौजम यांनी केले.