Selfie : अमृत महोत्सवानिमित्त ‘सेल्फी विथ तिरंगा’अभियान
परभणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परभणी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्यामार्फत दि.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘ सेल्फी विथ तिरंगा ‘ अभियान राबवीण्यात येणार असून, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अभियानाच्या कालवधीत परभणी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर “सेल्फी विथ तिरंगा” या शिर्षकाखाली www.parbhani.gov.in/selfiewithtiranga/ आपले छायाचित्र अपलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहभागींपैकी निवडक छायाचित्रे परभणी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, लकी ड्रॉमार्फत निवडक नागरिकांचा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. भारत सरकारतर्फे चालविण्यात येत असलेल्या “हर घर तिरंगा” या अभियानाअंतर्गत https://harghartiranga.com ) या संकेतस्थळावर “सेल्फी विथ तिरंगा” या शिर्षकाखाली उपलब्ध असलेल्या लिंकवर जावून आपले छायाचित्र अपलोड करावे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल व जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.