DIAL 112 : सेलू पोलिस तात्काळ मदतीला

DIAL ११२ : सेलू पोलिस तात्काळ मदतीला

सेलू : मुलांनो घाबरू नका. जेव्हा तुम्हांला आमची मदत पाहिजे असेल, तेव्हा फोनवर 112 हा नंबर डायल करा. पोलिस लगेच मदतीला पोहोचतील, असे सेलूचे पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी सांगितले.
येथील न्यू हायस्कूलमध्ये पोलिस निरीक्षक गाडेवाड यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. संवाद साधला. शालेय जीवनापासून मुलांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय कायदा, काही कलमे याची माहिती गाडेवाड यांनी याप्रसंगी दिली. कायदा विद्यार्थ्यांना कसा उपयोगी आहे, हे सांगितले. मुलांनो घाबरू नका, जेव्हा तुम्हांला आमची मदत पाहिजे असल्यास 112 हा नंबर डायल करा. पोलिस लगेच आपल्या मदतीला पोहचतील; तसेच पोक्सो कायदा कशासाठी आणि आपले कसे रक्षण करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. मुलांच्या मनात वाटणारी भीती पोलीस निरीक्षक गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाने कमी झाली. यानिमित्ताने अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गाडेवाड यांच्या सोबत फोटो घेण्यासाठी गर्दी केली. या वेळी पोलिस कर्मचारी चौरे, मुंढे उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक धनंजय भागवत यांनी केले. आभार गणेश गुद्दे यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!