Independence Day : सामुदायिक नृत्य, गायनाने देशभक्तीचा जोश

सेलू  :  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित स्व.आण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर समूहगीत व नृत्य स्पर्धेत विविध शाळेतील संघांनी अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांचे मने जिंकली. स्फूर्तिदायक नृत्य, गायनाने देशभक्तीचा जोश भरला.

येथील श्री साई नाट्यगृहात रविवारी, १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या  स्पर्धचे उद्घाटन ज्येष्ठ नाटयकर्मी रवि कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रेक्षाताई भांबळे, आयोजक अशोक काकडे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे, अशोक अंभोरे, छगन शेरे, रामेश्वर राठी, गोपाल काबरा, संतोष कुलकर्णी, ॲड उमेश खारकर, रमेश डख, चंद्रशेखर मुळावेकर, माऊली ताठे, पुरूतोतम पावडे, मनिष कदम, रघुनाथ बागल, अविनाश शेरे, मजीद बागवान, आप्पासाहेब डख, हभप पुरूषोत्तम महाराज वालूरकर, मधुकर पौळ, शीलाताई काकडे, निर्मलाताई लिपणे आदीची उपस्थिती होती. देशभक्तीपर समूहगीत व समूह नृत्य स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थानी देशभक्तीपर समूह गीत सादर करताच उपस्थितांची दाद मिळवली. तसेच समूह नृत्य स्पर्धेत देशभक्तीपर गीतावर अप्रतिम नृत्य सादर करून चैतन्य निर्माण केले.  परीक्षक म्हणून यशवंत चारठाणकर, अनघा पांडे, संजय मंडलिक, अजय भंडारे, अभय भंडारे, ॲड.सतीश राऊतखेडकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक अशोक उफाडे यांनी केले सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी, तर आभार राधाकिशन महाराज गोरे  यांनी मानले. स्पर्धसाठी अमर ठाकूर, सतीश आकात, रवी मुळावेकर, श्रीपाद कुलकर्णी,भारत इंद्रोके, गोटू धापसे, गौस लाला, पप्पू शिंदे, परवेज सौदागर आदींनी पुढाकार घेतला.

नूतन, यशवंत, ज्ञानतीर्थ विजेते

समूहगीत स्पर्धचे प्रथम पारितोषिक नूतन विद्यालय संघाने, व्दितीय नूतन महाविद्यालय, तृतीय नूतन कन्या प्रशालाने पटकावले. विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये, दोन हजार रूपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समूहनृत्य स्पर्धचे प्रथम पारितोषिक यशवंत विद्यालयाच्या संघाने पटकाविले. द्वितीय नूतन कन्या प्रश्नाला, तर तृतीय पारितोषिक ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या संघाने मिळविले. अनुक्रमे अकरा हजार एकशे अकरा रुपये, सात हजार सातशे सत्याहत्तर,  पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये रूपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. समूहगीत स्पर्धेत आठ, तर समूह नृत्य स्पर्धेत बारा संघांनी सहभाग घेतला. सहभागी संघांना प्रत्येकी एक हजार रूपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

हेही वाचा ः सेलूतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

हेही वाचा : Dance Competition : व्हिजन इंग्लिश, केशवराज बाबासाहेब, ज्ञानतीर्थ विद्यालय विजेते

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!