Dance Competition : व्हिजन इंग्लिश, केशवराज बाबासाहेब, ज्ञानतीर्थ विजेते
सेलू : येथील नगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सोमवारी (१५ ऑगस्ट) आयोजित देशभक्तीपर समूहनृत्य स्पर्धेत व्हिजन इंग्लिश स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. व्दितीय केशवराज बाबासाहेब विद्यालयाने, तर ज्ञानतीर्थ विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिकेच्या प्रशासक अरूणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. साई नाट्य मंदिरात सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी देविदास जाधव, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, डॉ.विलास मोरे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांना सुरूवात झाली. एकूण दहा संघांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व प्रथम पारितोषिक रोख अकरा हजार रुपये, द्वितीय सात हजार रुपये, तर तृतीय पाच हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. नूतन कन्या प्रशाला, यशवंत विद्यालय संघांना रोख दोन हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक, तर मॉडर्न इंग्लिश स्कूल, नूतन विद्यालय, नूतन महाविद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या सहभागी संघांचे रोख एक हजार रुपये पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. परीक्षक म्हणून दिलीप खंडेराय, प्रा. वैजनाथ राठोड व मेघा गायकवाड यांनी काम पाहिले. या वेळी नांदेड येथील हास्य सम्राट रमेश गिरी यांनी खळखळून हसवत स्पर्धेत रंगत आणली. सूत्रसंचालन नाट्यकर्मी रवी कुलकर्णी, गिरीश लोडया यांनी केले. गंगाधर कान्हेकर यांनी आभार मानले. रवींद्र मुळावेकर, प्रा.ए.डी.कुलकर्णी, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
नूतन कन्या प्रशाला, यशवंत विद्यालय संघांना रोख दोन हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक, तर मॉडर्न इंग्लिश स्कूल, नूतन विद्यालय, नूतन महाविद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या सहभागी संघांचे रोख एक हजार रुपये पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले.
हेही वाचा ः सामुदायिक नृत्य, गायनाने देशभक्तीचा जोश
हेही वाचा : Minister Atul Save : ३४६ कोटी ८८ लाखांचा पिक विमा जमा