Blood Donation : सेलूतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
सेलू ः येथील तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण पार पाडल्यानंतर सेलू शहरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तलाठी संघाचे अध्यक्ष मुकूंद आष्टीकर, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत सेलू शहरातील सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी तथा मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी स्वेच्छेने रक्तदान करत शिबिराची सुरवात केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने ३१ रक्तदाते सहभागी झाले होते. रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपक्रम यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.