जाणिवा जागृतीसाठी सेलू महिला मंडळ कटिबद्ध : विजया कोठेकर

परभणी : सामाजिक ध्येय सामाजिक कार्य करत राहणे एवढेच महिला मंडळाचे ध्येय आहे. समाजातील उपेक्षित घटकांचा व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणे त्यांच्या कार्याची नोंद घेणं. हे महिला मंडळ आजपर्यंत करत आले आहे, असे प्रतिपादन सेलू महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर यांनी केले.
रक्षाबंधनाचे औचित्य साधत बहीणभावाचे नाते वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती हीच भेटवस्तू असल्याचेही मत कोठेकर यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर सचिव ललिता गिल्डा, पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, अशोक अंभोरे, डी. व्ही. मुळे, डॉ. विलास मोरे आदींची उपस्थिती होती.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार डी.व्ही. मुळे, दिलीप डासाळकर, डॉ. विलास मोरे, मोहन बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन देशमुख यांनी केले. स्वागतगीत मीरा धामणगावकर यांनी गायिले. कार्यक्रमाला महिला मंडळ, पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य आदींसह महिला उपस्थित होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!