Nutritional : ७००० पोषक आहार पुस्तिकांचे मोफत वाटप

Nutritional : ७००० पोषक आहार पुस्तिकांचे मोफत वाटप

सेलूतील मालाणी परिवाराचा उपक्रम, स्वातंत्र्य दिनाच्या प्रभात फेरीत केले वितरण

सेलू : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील सनशाईन बाल रूग्णालयातर्फे “निरोगी बालक, निरोगी भारत ” या बालकांच्या पोषक आहारविषयक ( Nutritional Diet ) माहिती पुस्तिकेच्या सात हजार प्रतींचे शालेय विद्यार्थ्यांना मोफत वितरण करण्यात आले.
सोमवारी (१५ ऑगस्ट) सकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, डॉ.योगिता मालाणी, डॉ.शैलेश मालाणी, श्रीनिवास झंवर, अनुप गुप्ता, राजेंद्र सराफ, कृष्णा काटे, बंटी बजाज, शेख मुनीर, सूर्यकांत जाधव, हितेश शहा, वल्लभ राठी, सुनील गायकवाड, प्रणव भुतडा, माधवेश भुतडा, संदीप टाक, प्रेम चव्हाण, स्वप्नील जाधव, नकुल जाधव, शाम मालाणी, डॉ सुजीत मालाणी, गिरीश मालाणी, डॉ सुदर्शन मालाणी,शिवनारायण मालाणी, सोयल मिर्झा, महादेव टाके, सोफियान, उमेश गजमल, आनंद बाहेती, भाऊ माणकेश्वर, दिलीप भंडारी, श्रीनिवास काबरा आदींची उपस्थिती होती. शहरातील एकूण १५ शाळेतील ७ हजार विद्यार्थ्यांना व माता पालकांना मोफत माहिती पुस्तक व खाऊ वाटप करण्यात आले.

हेही वाचा : STRONG WILL : …आणि अनुष्का शाळेत आली; बोललीसुद्धा

हेही वाचा : Open Competition : आंतरभारतीतर्फे खुली राष्ट्रीय निबंधलेखन स्पर्धा

Please Share

One thought on “Nutritional : ७००० पोषक आहार पुस्तिकांचे मोफत वाटप

  1. This is such an informative and well-written post! I learned a lot from reading it and will definitely be implementing some of these tips in my own life

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!