कथाकथन : आवेज, क्षितिजा, समिक्षा, ऋतुजा सर्वप्रथम
सेलू तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे नूतन कन्या प्रशालेत बक्षीस वितरण, दुर्गाताई कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपक्रम
सेलू : नूतन कन्या प्रशालेत कै.सौ. दुर्गाताई कुलकर्णी यांचा पाचवा स्मृतिदिन आणि नूतन कन्या प्रशाला सुवर्ण महोस्तवी वर्षानिमित्त आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या बक्षीस वितरण नुकतेच झाले. या वेळी बोलतांना नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी चिटणीस प्राचार्य डी.आर.कुलकर्णी म्हणाले, ” संस्कार कथा व्यक्तींच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवतात, जीवनास दिशादर्शक ठरतात. त्यामुळे विद्यार्थांनी बालवयापासून संस्कार कथांची सोबत ठेवायला हवी”
व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, संस्था सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, जिल्हा स्काऊट गाईड समन्वयक मिलिंद तायडे, पु.ना.बारडकर, मधुकर काष्टे, सुरेश राऊत, मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात कै. सौ .दुर्गाताई कुलकर्णी यांच्या प्रतिमा पूजनाने आणि “खरा तो एकची धर्म” प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता खराबे यांनी केले. कथाकथन स्पर्धेतील विजेत्या तथा सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यादी वाचन वैशाली चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी तर आभार सीमा सुक्ते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील प्राचार्य शरद कुलकर्णी, अनिल रत्नपारखी, श्रीकांत नेवरेकर, कैलास मलवडे, किशोर ढोके, नागेश देशमुख, प्रकाश खराटे, सुनील मोगल, अनंता बोराडे, किशोर विश्वामित्रे, सुहास देऊळगावकर, शशिकांत देशपांडे, विनोद शिंदे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी स्पर्धक, मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थी, प्रशालेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती
स्पर्धा निकाल असा : नूतन विद्यालय शिक्षण संस्था व्यतिरिक्त इ 4थी ते 6 वी : प्रथम- चि.शेख आवेज अजगर (जिजामाता बाल विद्यामंदिर, सेलू), द्वितीय-कु.हारकळ स्नेहल गजानन ( स्वामी विवेकानंद ,सेलू), 7 वी ते 9 वी : प्रथम- कु. खजिने क्षितिजा कैलास (प्रिन्स अकॅडमी, सेलू) द्वितीय- कु.दुर्गा नामदेव मगर (न्यू हायस्कूल,सेलू), संस्था अंतर्गत 4थी ते 6 वी : प्रथम- कु. कुलकर्णी समिक्षा दिनकर (नूतन कन्या प्रशाला,सेलू), द्वितीय -कु .देवधर गौरी अमित (नूतन इंग्लिश स्कूल, सेलू), 7 वी ते 9 वी : प्रथम – कु.रोडगे ऋतुजा रामप्रसाद (नूतन कन्या प्रशाला,सेलू), द्वितीय विभागून- चि.पारवे प्रज्वल डिगांबर (नूतन इंग्लिश स्कूल) आणि पवार शंतनू श्याम (नूतन विद्यालय, सेलू)