अभिमानास्पद : गवतावर साकारला भारत
परभणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील श्री गुगळेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी शाळेच्या प्रांगणात नैसर्गिकरीत्या उगवलेल्या गवतावर भारताचा नकाशा साकारला आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल डख यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक युवराज ब्रह्मराक्षे, अमोल पवार यांनी भारताचा नकाशा व आझादी का अमृत महोत्सव अशा मजकुराची कलाकृती साकारली. अनिल ब्रह्मराक्षे, राजेभाऊ मोरे, प्रदिप बनसोडे, लक्ष्मण ताल्डे, मीरा नाईकल, सारिका जोशी, सविता जोगदंड, सीमा डख, जयश्री कुलकर्णी यांनी या उपक्रमात योगदान दिले.