राजवाडीच्या सरपंचपदी वायदंडे, शिवहरी शेवाळे उपसरपंच
सेलू : सेलू तालुक्यातील मौजे राजवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दासाराव वायदंडे, तर उपसरपंचपदी शिवहरी शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई जैस्वाल, मुन्नाबी पठाण, अशामाती काष्टे, दिनकर शेवाळे, भागित्राबाई काष्टे आदींचा सत्कार करण्यात आला. चार ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवहरी शेवाळे यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामविकास पॅनलने तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले होते. युवा मोर्चाचे महादेव गायके यांनी ही माहिती दिली.