पत्रकाराशी हुज्जत : सेलूच्या मुख्याधिकाऱ्याचा निषेध
उपजिल्हाधिकार्यांना निवेदन : सेलू तालुका पत्रकार संघाच्यावतीने कार्यवाहीची मागणी
सेलू : नगरपरिषदेने केलेल्या प्रमाणपत्र दरवाढ प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराशी हुज्जत घालणाऱ्या, सेलू पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचा जाहीर निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी. अशी मागणी सेलू तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
२४ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्याकडे गेलेल्या पीबीएन ७ चे पत्रकार पंकज सोनी यांचा मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी मोबाईल हिसकावून घेत, त्यांच्या अंगावर धावून गेले. पत्रकाराला अपमानीत करणारी भाषा वापरली. जाधव यांच्या या गैरकृत्याचा सेलू तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून, पत्रकाराला अपमानीत करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर अध्यक्ष अशोक अंभोरे, सचिव मोहन बोराडे, राम सोनवणे विलास शिंदे, शिवाजी आकात. डॉ विलास मोरे, पंकज सोनी, बालाजी सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.