गणेशोत्सव : सेलूतील व्याख्यानमालेत भरगच्च कार्यक्रम

गणेशोत्सव : सेलूतील व्याख्यानमालेत भरगच्च कार्यक्रम

हीरक महोत्सवी वर्ष : व्याख्यान, परिसंवाद, गायनाचा कार्यक्रम

सेलू (जि.परभणी) : येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेला गुरुवार, एक सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. एक सप्टेंबर व सहा ते आठ सप्टेंबर या चार दिवसांत व्याख्याने, परिसंवाद व प्रतिभासंपन्न कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानिक गायक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब.गिल्डा सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम आहेत. अध्यक्ष नारायण सोळंके व चिटणीस गिरीश लोडाया यांनी ही माहिती दिली.

गणेशोत्सव काळात ज्वलंत सामाजिक विषयांवर लोकप्रबोधन आणि स्थानिक वक्ते, साहित्यिक, विचारवंत, कलावंत यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. व्याख्यानमालेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. गुरुवारी, एक सप्टेंबर रोजी ‘नाती जपून ठेवा, अंधार होत आहे.’ या विषयावर मानवत येथील के.के.एम.महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ.दुर्गेश रवंदे यांचे व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी ॲड.रुपाली आमले असतील. संयोजक‌ प्रणिता सोलापूरे, ज्योती अग्रवाल आहेत.मंगळवारी, ६ सप्टेंबर रोजी ‘सुखी आणि आरोग्यदायी जीवनाचा राजमार्ग’ या विषयावर परभणी येथील डॉ.सचिन पाठक यांचे व्याख्यान आहे. डॉ.उमेश गायकवाड अध्यक्षस्थानी असतील. संयोजक संजय पिंपळगावकर व अजित मंडलिक आहेत. बुधवारी, ७ सप्टेंबर रोजी ‘स्वातंत्र्याची अमृतगाथा ‘ या विषयावर परिसंवाद होणार आहे. श्रीपाद कुलकर्णी, कांचन बाहेती, सुभाष मोहकरे, कीर्ती राऊत, प्राध्यापक हेमचंद्र हडसनकर, डॉ.भाग्यश्री धामणगावकर, विरेश कडगे आदी वक्ते विचार मांडणार आहेत. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे असतील. डॉ.गंगाधर गळगे, नारायण ईक्कर संयोजक आहेत. गुरुवारी, ८ सप्टेंबर रोजी ‘ गोंदण शांताबाई शेळके यांच्या शब्दांचं ‘ हा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गायक यशवंत चारठाणकर, डॉ.राजेंद मुळावेकर, शाम आढे, डॉ.प्रवीण जोग, अनघा पांडे, सुरेखा रामदासी, अलका धर्माधिकारी, रमा बाहेती, पूजा तोडकर, डॉ.सीमा देऊळगावकर, डॉ.विलास मोरे, प्रकाश काळबांडे, संजय मंडलिक, लक्ष्मीकांत दिग्रसकर, कुमार हातरके, शेख लाला, शेख उस्मान,  रुचा डासाळकर, सुरेंद्र दिशागत, उत्तमराव दिशागत, बंडूनाना कदम, जाफर फारुकी, सच्चिदानंद डाखोरे, हेमलता देशमुख, संतोष कुलकर्णी,  बालासाहेब सोनटक्के, भास्कर शिंदे, वरद दलाल, शंतनू पाठक आदी कलाकार सादरीकरण करणार आहेत. संगीत संयोजन गंगाधर कान्हेकर, रवि मुळावेकर, गिरीश दीक्षित, अशोक जैस्वाल यांची आहे. उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, विनोदराव बोराडे, माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र डासाळकर, रणजित गजमल, प्रभाकर सुरवसे, सुधाकर पवार यांची उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ लहाने असतील. संयोजक मोहन बोराडे, सुरेश हिवाळे आहेत. नूतन विद्यालयाच्या राजेंद्र गिल्डा सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन व्याख्यानमाला अध्यक्ष एन.वाय.सोळंके, चिटणीस गिरीश लोडाया पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष एन.वाय.सोळंके, चिटणीस गिरीश लोडाया, कार्याध्यक्ष चंद्रशेखर  मुळावेकर, राजेश ढगे, लता गिल्डा, संतोष कुलकर्णी, कोषाध्यक्ष डॉ.कल्पना कुलकर्णी, उपाध्यक्ष चंद्रशेखर नावाडे, किशोर जोशी, उपेंद्र बेल्लुरकर, बाबासाहेब चारठाणकर, शोभा कोरडे, रवि कुलकर्णी, जयश्री सोन्नेकर, कल्याण पवार, संजय वाघ, शोभा ढवळे, डी.डी.सोन्नेकर, बी.टी.गजमल, सुधाकर नरळदकर, भगवान देवकते, प्रा.ए.डी.कुलकर्णी, प्रा.नागेश कान्हेकर, धनंजय भागवत, सहचिटणीस दिलीप डासाळकर, रोहिणी कुलकर्णी, ललिता गिल्डा, अश्विनी विटेकर, ज्योती अग्रवाल, रेवणअप्पा साळेगावकर, प्रवीण माणकेश्वर, शरद ठाकर, बी.के.गांजापूरकर गुरुबसअप्पा पंचगल्ले, सतीश नावाडे, गणेश माळवे, आर.डी.कटारे, आनंद बाहेती, रुपा काला, मीरा बहिवाल, मंजुषा बोराडे, दुर्गादास कुलकर्णी, शशीकांत देशपांडे, प्रशांत नाईक, विलास शिंदे, महमंद इलियास, सदस्य एस.आर.देशपांडे, एन.जी.बंगाळे, रौफखान पठाण, वसुधा खारकर, उज्ज्वला भाला, मधुरा खारकर, नीता मालाणी, चंदा मेहता, अनिता कुळकर्णी, नीता बलदवा, सविता कासट, मेघना चौधरी, मीना मालाणी, राजश्री शिवणकर, संगीता खारकर आदी परिश्रम घेत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!