अभिमानास्पद : जयप्रकाश बिहाणी यांना ‘महेश भूषण’ पुरस्कार

अभिमानास्पद : जयप्रकाश बिहाणी यांना 'महेश भूषण' पुरस्कार

जयप्रकाश बिहाणी यांना ‘महेश भूषण’ पुरस्कार 

सेलू (जि.परभणी) : येथील उद्योजक जयप्रकाश बद्रिनारायणजी बिहाणी यांना सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘ महेश भूषण ‘ पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथे आयोजित एका कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ढालेगाव येथील श्री समर्थ वेद विद्यालय, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेसह विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या जडणघडणीत आणि सेलू शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील विकासामध्ये बिहाणी परिवाराचे मोठे योगदान आहे. पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातून बिहाणी यांचे अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!