मनसे : परभणी जिल्ह्यात तीन लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य गाठणार
मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार, सदस्य नोंदणीला सेलूत उत्साहात सुरूवात
सेलू (जि.परभणी ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यभर मनसेचे सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. या अंतर्गत सेलू,जिंतूर विधानसभा मतदार संघात ५० हजार, तर परभणी जिल्ह्यात तीन लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य गाठणारच आहोत, असा निर्धार मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी, ३० ऑगस्ट रोजी सेलू येथे सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम झाला. या वेळी हा निर्धार व्यक्त करण्यात आला. उद्घाटक म्हणून मनसे शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी मुंडे उपस्थित होते, तर मनसे जिल्हाध्यक्ष गणेश, शेख राज, जिल्हा संघटक गुलाबराव रोडगे, सचिव गणेश भिसे, नागनाथ भुमरे, तालुकाध्यक्ष निजलींगअप्पा तरवडगे, शहराध्यक्ष गणेश निवळकर, जिंतूर तालुकाध्यक्ष ओंकार देशमाने, सय्यद जावेद, रामभाऊ मोगल, शेख जमील, शेख मन्सूर, कटारे आदींची उपस्थिती होती. सदस्यनोंदणीसाठी सेलू शहरातील प्रत्येक वार्डात शिबीर घेण्यात येणार आहे; तसेच सेलू व जिंतुर तालुक्यातील सर्व गावागावांमध्ये सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेऊन लोकांपर्य्रत राजसाहेबांचे विचार व हिंदुत्वाबद्दल जनजागृती कऱण्यात येणार आहे. सदस्य नोदणीसाठी जिल्हाभरासह सेलू, जिंतूर शहर व तालुक्यात वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. सेलू, जिंतुर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयासमोर, मॉल, दवाखाने, कॉलेज, मंदिरासमोर सदस्य नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे मनसे जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी या वेळी सांगितले.
परभणी जिल्ह्यात तीन लाख, सेलू,जिंतुर विधानसभा मतदार संघात ५० हजार सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे. प्रत्येक गावागावात जाऊन सदस्य नोंदणी करण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे अभियान चालणार आह.ऑनलाईन, ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईनसाठी क्यूआर कोड स्कॅन करून नोदणी करता येणार आहे; तसेच 8860300404 या मोबाईल नंबरवर मिस कॉल देऊन एसएमएसद्वारे लिंक मिळवून नोंदणी करता येणार आहे. MNS APP वरूनही सदस्य नोंदणी करण्याची सुविधा आहे, असे मनसे जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी सांगितले.