जयप्रकाश बिहाणी यांचा सेलू बाजार समितीतर्फे सत्कार
सेलू (जि.परभणी) : येथील प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बद्रीनारायणजी बिहाणी यांची राज्यस्तरीय महेश भूषण पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मंगळवारी, ३० ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे सचिव राजीव वाघ, बी.एस.ताठे, दे.जो.चव्हाण, दीपक शिंगणे, सुबोध देशमुख, अशोक वाटोडे, गजानन शिंदे, राजेश गोरे, दीपक ताठे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.