गणेशोत्सव : खड्डे बुजवा, ‘उजेड’ करा
सेलू (जि.परभणी) : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहराच्या अनेक भागातील पथदिवे बंद आहेत; तसेच रस्त्यावर जागोजागी झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने रस्त्यावरील खड्डे बुजवून पथदिवे सुरू करावेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करावी. अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात पालिकेचे अधिकारी मल्लिकार्जुन स्वामी यांना मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले. सणासुदीच्या काळात नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. अशी मागणीही करण्यात आली आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, विनोद तरटे, इम्तियाज खान, प्रदीप पवार, नरसिंग हरणे, योगेश कुलकर्णी, सोहेल अहेमद, शेख इरफान भाई, सतीश भोसले, गौसभाई, बबलू बागवान आदींची उपस्थिती होती.