राष्ट्रीय खेल पुरस्कार -२०२२ : प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

राष्ट्रीय खेल पुरस्कार : प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडाधिकारी संजय मुंढे यांची माहिती

हिंगोली : केंद्रशासनाच्या पत्रान्वये उपसचिव, भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन अवार्ड, २०२२ आदी राष्ट्रीय खेल पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडाधिकारी संजय मुंढे यांनी ही माहिती दिली.

नामनिर्देशनाचा प्रस्ताव दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्रशासनास सादर करावा. विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे नमूद केलेले आहे. तसेच या वर्षीपासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरीता मार्गदर्शक तत्वानुसार ( Award Guidelines) अर्जदारांना स्वतः फक्त ऑनलाईन पोर्टलव्दारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची/अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्रशासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर / वेबसाईटवर सादर करावे, असे सुचित केले आहे; तसेच ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At section-sp-moyas@gov.in. किंवा ०११-२३३८७४३२ या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी ९.०० ते सायं ५.३० पर्यंत संपर्क करता येईल. केंद्रशासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली व विहित नमुना अर्ज http://yas.nic.in/sports या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या खेळाडू, संघटक, क्रीडा शिक्षकांनी उपरोक्त वेबसाईटवरील नियमावली व विहीत अर्जाचा नमुन्याचे अवलोकन करून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळोमध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी ( विद्यापीठाकरीता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन अवार्ड, २०२२ करीता नामांकने सादर करण्याचे आवाहान जिल्हा क्रीडाधिकारी  संजय मुंढे यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!