आंदोलन : विमा प्रतिनिधी संघटनेचे सेलूत जोरदार आंदोलन
एलआयसी धोरणाच्या निषेधार्धात घोषणाबाजी
परभणी : देशातील सर्वात मोठ्या भारतीय जीवन विमा महामंडळाच्या नव्या धोरणाच्या निषेधार्थ; तसेच विविध मागण्यांसाठी सेलू ( जि.परभणी) येथील विमा प्रतिनिधी संघटनेतर्फे सोमवारी, ५ सप्टेंबर रोजी एलआयसी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
ऑल इंडिया इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नांदेड वेस्टर्न झोनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्यावतीने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेच्या सेलू शाखेतर्फे असहकार आंदोलन,विश्राम दिवस थाळी नाद करण्यात आला. या निमित्ताने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. वाढत्या महागाईचा विचार करता विमा प्रतिनिधीच्या आर्थिक हिताला हानी पोहचेल,असा निर्णय घेवू नये, एजंट टर्मिनेशन कायदा रद्द करण्यात यावा, ग्राहकाच्या पॉलिसीवरिल बोनस वाढविण्यात यावा, पॉलिसी हप्त्यावरील जीएसटी रद्द करण्यात यावा. पॉलिसी कर्जावरील व्याजदर कमी करण्यात यावेत, विमा प्रतिनिधींना मिळणारी ग्रॅज्युएटी वाढवण्यात यावी, विमा प्रतिनिधींना पेन्शन देण्यात यावे, प्रतिनिधीचा आरोग्य वीमा वाढवण्यात यावा, वाढीव विमा सरंक्षण द्यावे. आदी मागण्यांबाबत घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.