सण महालक्ष्मीचा : सेलूतील रामपूरकर परिवाराने घडविला स्वातंत्र्य लढ्याचा जागर

सण महालक्ष्मीचा : सेलूतील रामपूरकर परिवाराने घडविला स्वातंत्र्य लढ्याचा जागर

वैविध्यपूर्ण आरास मांडण्याची २६ वर्षांची परंपरा : महिला भगिनी, प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद

सण महालक्ष्मीचा : सेलूतील रामपूरकर परिवाराने घडविला स्वातंत्र्य लढ्याचा जागर

सेलू (जि.परभणी) : मराठवाड्यात महालक्ष्मीचा सण म्हणून ओळखला जाणार्‍या गौरी गणपतीच्या निमित्ताने सेलू (जि.परभणी) येथील रामपूरकर परिवाराने यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त महालक्ष्म्यांसमोर स्वातंत्र्य लढ्याचा जागर घडवून आणला आहे. पर्यावरणाचा संदेशही दिला आहे.
वकील गल्लीतील रहिवासी अरुण रामपूरकर हे, येथील नूतन विद्यालयातील सायकल स्टँडवर, तर त्यांच्या पत्नी बेबीताई पोषण आहार विभागात कार्यसेवा देतात. या परिवाराने करोना काळातील दोन वर्षे वगळता, वैविध्यपूर्ण आरास मांडण्याची २६ वर्षांपासूनची  परंपरा यंदा मोठ्या उत्साहाने जपली आहे. आरास पाहण्यासाठी महिला भगिनी प्रेक्षकांंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर महापुरुष, स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रतिकृती; तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील प्रसंगाचा सुंदर देखावा सादर केला आहे. जो़डीला स्फूर्तिगीतांच्या पार्श्वसंगीताने चैतन्य फुलविले आहे. भगव्या पताका, तिरंगा ध्वज, गर्द हिरव्या लता वेली आणि विविध रोपांच्या गर्द दाटींतून पर्यावरणाचाही संदेश देण्यात आला आहे. करोना काळात दोन वर्षे आरास मांडता आली नाही. मात्र यंदा ही परंपरा जपता आल्याचा आनंद आहे. पत्नी बेबीताई, मुलगा गोविंद, गोपाळ आरास मांडण्यात हिरीरीने सहभाग घेतात, असे रामपूरकर म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर महापुरुष, स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रतिकृती; तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील प्रसंगाचा सुंदर देखावा सादर केला आहे. जो़डीला स्फूर्तिगीतांच्या पार्श्वसंगीताने चैतन्य फुलविले आहे. भगव्या पताका, तिरंगा ध्वज, गर्द हिरव्या लता वेली आणि विविध रोपांच्या गर्द दाटींतून पर्यावरणाचाही संदेश देण्यात आला आहे. करोना काळात दोन वर्षे आरास मांडता आली नाही. मात्र: यंदा ही परंपरा जपता आल्याचा आनंद आहे. पत्नी बेबीताई, मुलगा गोविंद, गोपाळ आरास मांडण्यात हिरीरीने सहभाग घेतात, असे अरूण रामपूरकर म्हणाले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!