आठवण : गुरुवारी साहित्य मेळा; मुलाखत, संवाद, बालकवी संमेलन

आठवण : गुरुवारी साहित्य मेळा; मुलाखत, संवाद, बालकवींचे  संमेलन 

परतूर : स्व.दत्तात्रय हेलसकर यांचा सातवा स्मृतिदिन : गीतकार दासू वैद्य यांची मुलाखत, विनोद शिरसाठ यांचा संवाद, बालकवींचे संमेलन

जालना : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस ( ता.मंठा) चे संस्थापक अध्यक्ष स्व.दत्तात्रय हेलसकर यांचा सातवा स्मृतिदिन गुरुवारी ( ८ सप्टेंबर) आहे. स्मृतिदिनी अभिवादन, मुलाखत, संवाद आणि बालकवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

परतूर येथील विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालना यांच्या संयुक्त सहकार्याने स्व.दत्तात्रय हेलसकर स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी साडेदहा वाजता परतूर येथे करण्यात आले आहे. अभिवादन कार्यक्रमास डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी भाषा विभाग प्रमुख तथा ख्यातनाम गीतकार डाॅ.दासू वैद्य यांची मुलाखत प्राचार्य डाॅ.सुधाकर जाधव हे घेणार आहेत. साने गुरुजी यांनी सुरु केलेले ‘ साधना’ साप्ताहिक ७५ वर्षांत वाटचाल करीत आहे. यानिमित्त संपादक विनोद शिरसाठ संवाद साधणार आहेत. अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद सेवा केंद्राचे अध्यक्ष डॉ.एस.जी.बाहेकर हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संदीप बाहेकर,‌ हेलस कथामाला शाखेच्या अध्यक्षा कल्पना दत्तात्रय हेलसकर, सानेगुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते, प्रमुख कार्यवाह आर.आर.जोशी, कार्याध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष डाॅ.दिगंबर दाते, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, विजय वायाळ, बाबासाहेब हेलसकर, संतोष मुसळे, डाॅ.यशवंत सोनुने, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमानंतर अभिनेते, गीतकार विनोद जैतमहाल यांच्या अध्यक्षतेखाली बालकवींचे कविसंमेलन होईल. बालकवींच्या कविसंमेलनात अदिती जोशी, नेहा उबाळे, अनुश्री तोटकर, वेदांत लोमटे, दिव्या जाधव, शंभावी देशमुख, सार्थक पाठक, संस्कृती सिरसाट, रोहिणी शेरे, वैष्णवी मुसळे, संपत शेरे या बालकुमारांचा सहभाग असेल. साहित्यप्रेमी, रसिक,वाचकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे,असे विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शिंदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील खरात,रामदास कुलकर्णी, संदीप इंगोले यांनी कळविले आहे.

अभिनेते, गीतकार विनोद जैतमहाल यांच्या अध्यक्षतेखाली बालकवींचे कविसंमेलन होईल. अदिती जोशी, नेहा उबाळे, अनुश्री तोटकर, वेदांत लोमटे, दिव्या जाधव, शांभावी देशमुख, सार्थक पाठक, संस्कृती शिरसाट, रोहिणी शेरे, वैष्णवी मुसळे, संपत शेरे या बालकुमारांचा  सहभाग असेल.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!