सन्मान : युवराज माने, योगेश ढवारे, जाधव यांचा गौरव, सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम
जिल्हा निबंध स्पर्धैतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
सेलू (जि.परभणी) : येथील श्रीराम प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त दिले जाणारे आदर्श, उपक्रमशील व नाविन्यपूर्ण शिक्षक पुरस्कार मंगळवारी (६ सप्टेंबर) प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून परभणीच्या नूतन विद्या मंदीर शाळेतील निवृत्त शिक्षक ओमकार देवठाणकर, सुभाष जोशी, अरमळ, खूपसे, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे, प्राचार्य अशोक बोडके, प्रा.मीनाक्षी रत्नपारखी, प्रा.निलीमा सिंग कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, शालिनी शेळके आदींची उपस्थिती होती.
या वेळी पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक युवराज माने यांना आदर्श शिक्षक, सेलूच्या केशवराज बाबासाहेब विद्यालयातील योगेश ढवारे यांना उपक्रमशील, तर परभणी येथील संबोधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नवनाथ जाधव यांना यांना नाविन्यपूर्ण उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्या कीर्ती राऊत ( नूतन कन्या प्रशाला, सेलू) यांना प्रथम, शरद ठाकर ( जिल्हा परिषद शाळा, केमापूर) यांना द्वितीय, तर जिपप्राशा, एरंडेश्वर येथील प्रेमेंद्र भावसार यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शिवकन्या भोगावकर, जानवी मोराणकर, संदीप आकात यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. संस्थेअंतर्गत ज्ञानतीर्थ विद्यालयातून कालिंदा पवार, सतीश बरसाले, सुनील मुसळे , धम्मपाल ठोके यांना, प्रिन्स इंग्लिश स्कूलमधून रोज, जया साघोलसेम, वंदना खरावणे, रीना ठाकूर , प्रॉस्पेरियस पब्लिक स्कूल मधून राजेंद्र जाधव, धनश्री हुगे, अपूर्वा पॉलिटेक्निकच्या वाघ एस.एम., इंगोले जी.वाय, आदित्य डीएड कॉलेजचे किरणकुमार पुंडकरे, डॉ.राम रोडगे बी.एड कॉलेजचे भागवत थोरात, आदित्य कनिष्ठ महाविद्यालय वालूर येथील अन्सारी नाझनीन मसुद यांना देखील आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते, असे मत ओमकार देवठाणकर यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ.संजय रोडगे म्हणाले, ‘गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही. समाजात शिक्षकांचे एक विशिष्ट स्थान असते. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. चांगल्या शिक्षकांमुळे सामर्थ्यवान पिढी तयार होते.” युवराज माने, योगेश ढवारे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सूत्रसंचालन संजय ठाकरे यांनी केले.
डॉ.संजय रोडगे म्हणाले, ‘गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही. समाजात शिक्षकांचे एक विशिष्ट स्थान असते. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. चांगल्या शिक्षकांमुळे सामर्थ्यवान पिढी तयार होते.”