Helath First : निरोगी राहण्यासाठी हे करा…
डॉ.सचिन पाठक यांचे मत, सेलूतील गणेशोत्सव व्याख्यानमाला
सेलू (जि.परभणी) : आहार किती घ्यायचा याचा साकल्याने विचार करा. वेळेवर जेवण फार महत्वाचे आहे. उभे राहून जेवण करणे टाळावे. भारतीय पद्धतीप्रमाणे बसून जेवण करणे हे उपयोगी आहे, असा सल्ला परभणी येथील डॉ.सचिन पाठक यांनी दिला आहे. येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ.पाठक यांनी मंगळवारी गुंफले. ” सुखी आणि आरोग्यदायी जीवनाचा राजमार्ग ” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. पाठक म्हणाले, ” फळ, पाले, भाज्या खाणे योग्य. वयोमानाप्रमाणे आपला आहार वेगवेगळा असावयास पाहिजे. जेवतांना मन शांत पाहिजे. योगासन, प्राणायम करणे आवश्यक आहे. त्याच्या योग्य ज्ञानाची गरज आहे. अध्यक्षस्थानी डॉ.उमेश गायकवाड होते. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर, तर आभार अजित मंडलिक यांनी मानले. यावेळी डॉ.पाठक यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली, तर संस्कृती डहाळे, आद्या राऊत, सृष्टी सोळंके, श्रुती खंदारे या विद्यार्थ्यांनीदेखील देविदास सोन्नेकर, गणेश माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करून दाखविली.