मोर्चा : नराधमांना फाशीची शिक्षा द्या 

 

नराधमांना फाशीची शिक्षा द्या

मोर्चा : नराधमांना फाशीची शिक्षा द्या 

बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ सेलूत मोर्चा, ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद 

परभणी : सेलूतील एका दहा वर्षीय बालिकेवर पळवून नेत अत्याचार करणार्‍या नराधमांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत सेलू (जि.परभणी) येथे गुरुवारी ( ८ सप्टेंबर) मोर्चा काढून; तसेच उत्स्फूर्त बंद पाळून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. 

हुतात्मा स्मारक पासून मोर्चाला सुरुवात झाली. क्रांती चौकात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. शांतता प्रिय सेलू शहरात अत्याचार व खून यासारख्या घटनाबाबत कारवाई झालीच पाहिजे. पोलीस यंत्रणेने सदर घटनेतील गुन्हेगारांना तत्परतेने अटक केली आहे मात्र; या गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर शिक्षा देण्यात आली पाहिजे. निर्भया कायद्याची अंमलबजावणी सरकारने केलीच पाहिजे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मोर्चामध्ये विविध पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच सेलूतील छोटे-मोठे व्यावसायिक व्यापारी, प्रतिष्ठाने, शैक्षणिक संस्था आदींनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून निषेध नोंदविला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!