गणेशोत्सव : कवयित्री शांताबाई शेळके यांच्या गीतांनी व्याख्यानमालेची सांगता

गणेशोत्सव : कवयित्री शांताबाई शेळके यांच्या गीतांनी व्याख्यानमालेची सांगता

सेलू : ‘गोंदण’ मैफिलीने शांताबाई यांना गायक कलाकारांचे अभिवादन

गणेशोत्सव : शांताबाई शेळके यांना गीतांमधून अभिवादन 

सेलू : येथील हीरक महोत्सवी गणेशोत्सव व्याख्यानमालेची सांगता गुरूवारी, आठ सप्टेंबर रोजी ‘गोंदण’ गीत मैफिलीने झाली.अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, माजी सभापती रवींद्र डासाळकर यांची उपस्थिती होती. गणेशोत्सव व्याख्यानमालेचे चौथे पुष्प हे कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘ गोंदण शांताबाई शेळके यांच्या शब्दांच ‘ या त्यांच्या गीत मैफिलीचे होते. या गीत मैफिलीत डॉ.प्रविण जोग, सच्चिदानंद डाखोरे, रमा बाहेती, यशवंत चारठाणकर, अलका धर्माधिकारी, सुरेन्द्र दिशागत, सुरेखा रामदासी, डॉ.राजेंद्र मुळावेकर, ऋचा डासाळकर, पूजा तोडकर, लक्ष्मीकांत दिग्रसकर, शिरिष संघई, शंतनू पाठक, शेख लाला, कुमार हातरके, शाम आढे, जाफर फारुकी, बालासाहेब सोनटक्के या गायकांनी सहभाग नोंदविला. यांना गिरीश दिक्षित, प्रणव जोग यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक गणेशोत्सव व्याख्यानमालेचे चिटणीस गिरीश लोडाया यांनी केले. सूत्रसंचालन संयोजक सुरेश हिवाळे यांनी केले. आभार मोहन बोराडे यांनी मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक नारायण सोळंके, चंद्रशेखर मुळावेकर, बाबासाहेब चारठाणकर, डॉ.विलास मोरे, रेवणअप्पा साळेगावकर, शरद ठाकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, दिलीप डासाळकर, संगीता खारकर, जयश्री सोन्नेकर, शोभा ढवळे, देवीदास सोन्नेकर, रवी मुळावेकर , केशव डहाळे, अरूण रामपुरकर, विलास अवचार आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!