शिवसेना : माजी आमदार लहाने ‘मोठ्या’ गटात 

शिवसेना : माजी आमदार लहाने ‘मोठ्या’ गटात 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पैठण येथे प्रवेश 

पाथरी : विधानसभा मतदार संघाचे सलग तीन वेळा प्रतिनधित्व केलेले शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात अर्थात ‘मोठ्या’ गटात, सोमवारी (१२ सप्टेबर) रोजी पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह प्रवेश केला. या वेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे, माजी मंत्री अर्जून खोतकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार लहाने यांचे भगवी शाल देऊन स्वागत केले. या वेळी माजी आमदार लहाने यांच्यासह सेलू, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील शंभरावर समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोकराव गिराम यांनी दिली.

हेही वाचा : पाथरी-सेलू रस्त्याची डागडुजी सुरू

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!