आर्य वैश्य युथ : गुणवंत विद्यार्थी, पदाधिकाऱ्यांचा सत्कार
विविध मान्यवरांची उपस्थिती, सेलू शहर महिला अध्यक्षपदी राजश्री लोकुलवार
सेलू : आर्य वैश्य युथ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत मनोहर कोकड, महिला राज्य अध्यक्ष डॉ.स्नेहल लाभशेटवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सेलू (जि.परभणी) शहर आर्य वैश्य युथ महिला कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. या वेळी गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
मोहिनी मुनगीलवार, पुणे, ज्योती चक्रवार, परभणी, जयश्री बंडेवार तामसा, रुपाली दलाल, वसमत, कीर्ती कतरुवार, मानवत, गौरी गुंडेवार, हिंगोली, राशी पामे, पाथरी स्मिता वट्टमावार, जिंतूर, नंदिनी डाके, सोनपेठ, संगीता कत्रुवार, रुक्मिणी पत्तेवार, अनुजा डमढेरे, मानवत, वैशाली पामे, पाथरी, स्मिता वट्टमवार, जिंतूर, विनायक मुनगीलवार, अनिकेत पत्तेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दीप प्रज्वलन, माता वासवी आणि हभप वेदांत केसरी रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी महिला युथच्या शहरअध्यक्षपदी राजश्री माधव लोकुलवार यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणी अशी : राजश्री लोकुलवार (अध्यक्ष), चेतना काचेवार (उपाध्यक्ष), मंजुषा कोत्तवार (सचिव ), समिती सदस्य म्हणून, कलकोटे, कल्पना दाचावार, सुषमा पेडगुलवार, रीना कोत्तावार, श्रुती काचेवार, संगीता तमेवार, सुजाता कोटलवार, रजनी कचेवार, अश्विनी बंडेवार, सुरेखा काचेवार, काचेवार शादेवार, रोहिणी गोशेटवार, कल्पना गादेवार, मंदा राजकोंडवार, सुनिता फुटाणे, भाग्यश्री राजकोंडवार, वनमाला कोत्तावार, शिल्पा कोटलवार, कमल मुक्तावार, रुपाली मालशेटवार, राजश्री फुटाणे, भारती रेवणवार, सेजल गादेवार यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन मंजुषा कोत्तवार यांनी केले.
प्रमुख पाहुणे सुर्यकांत मनोहर कोकड यांनी मार्गदर्शन केले. गेल्या १९ वर्षापासून युथ सामाजिक कार्यात आहे. आजीवन दत्तक घेतलेली कुटुंब आणि कोरोना काळामध्ये गरजूंना केलेली मदत युथच्या लोगोचे महत्व विशद करणारा आहे. या वेळी डॉ.स्नेहल लाभशेटवार यांच्या हस्ते श्रावणी पदमाकर फुटाणे हिचा NEET मध्ये परभणी जिल्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. दररोज एक रुपया जमा करणे व त्यातून समाज कार्य करणे किंवा गरजूंना मदत करणे, गरजूंना शिक्षणा साठी मदत करणे, प्रत्येक महिन्यातून एक वेळा बैठक घेऊन नियोजन करणे, नवरात्रीमध्ये दंडिया, गरबा सांस्कृतिक कार्यक्रम घेणे. या वेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजश्री माधव लोकुलवर यांनी आभार मानले. कार्र्यक्रमाला आर्य वैश्य कोमटी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.