Foxconn : राज्य सरकारच्या धोरणाचा सेलू काँग्रेसतर्फे निषेध

Foxconn : राज्य सरकारच्या धोरणाचा सेलू काँग्रेसतर्फे निषेध

हेमंतराव आडळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन 

सेलू : केंद्र व राज्य सरकरच्यावतीने वेदांत फॉक्सकॉन कंपनी गुजरात राज्यात पाठविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सेलू तालुका काँग्रेसच्यावतीने गुरुवारी, १५ सप्टेंबर रोजी प्रशासनाला निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकल्पामुळे राज्यात रोजगार निर्मितीचा प्रश्न मिटला असता. सोबतच लहान लहान उद्योग सुरू झाले असते. याचा फायदा महाराष्ट्र राज्याला झाला असता. मात्र ही कंपनी गुजरात मध्ये नेण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर,विनोद तरटे, मुश्ताक रब्बानी, चंद्रशेखर मुळावेकर, शेख रफिक, ॲड. किशोर जवळेकर आदींच्या सह्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!