Engineer’s Day : सेलूतील अभियंत्यांचा साईबाबा बँकेतर्फे सत्कार
अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी व्यक्त केली अभियंत्यांबद्दल कृतज्ञता
सेलू : भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती तथा अभियंता दिनानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेतर्फे शहरातील विविध अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी “राष्ट्र उभारणीत अभियंत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.” अशा शब्दांत अभियंत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी रामराव लाडाणे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, व्यवस्थापक अविनाश आडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभात अभियंता रशीदखाँ पठाण, गंगाधर आडळकर, सतीश बलदवा, प्रमोद कुलकर्णी, अर्शद शेख, रवी मंत्री, बालाजी उदावंत, सुशील नाईकवाडे,भागवत कुमावत, जोशी, धामणगावकर, गजानन आडळकर, सुदर्शन आडळकर आदींसह वीस अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला.
हेमंतराव आडळकर म्हणाले, ” ज्ञान व कौशल्याचा वापर करून या जगाला सुंदर आणि राहण्याजोगे बनविणारे इंजिनीअर्स ग्रेट आहेत. थक्क करणार्या उत्तुंग इमारती, उड्डाणपूल, धरण, रेल्वेमार्ग दिसतात त्यात अभियंत्यांची कल्पकता, मेहनतीच्या दिसून येते. कोयना जलविद्युत केंद्र पाहून अभियंत्यांच्या अद्भुत कार्याची प्रचिती येते. किल्लारी सारख्या भूकंपात उध्वस्त झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्उभारणीसाठी अभियंत्यांनी मुदतीचे हात पुढे केले. भारताच्या जडणघडणीत स्थापत्य, वीज, संगणक, स्वॉफ्टवेअर, यंत्र, तंत्रज्ञान आदी सर्व प्रकारच्या अभियंत्यांचे मोठे योगदान लाभत आहे. सत्काराबद्दल सतीश बलदवा यांनी अभियंत्यांच्यावतीने संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.