राष्ट्रवादी : धैर्य आणि संयमाने जनतेची कामे करा : माजी आमदार विजय भांबळे
सेलू : माजी आमदार विजय भांबळे यांचे आवाहन, सेलू तालुक्यात सभासद नोंदणी अभियानाला उत्साहात सुरुवात
सेलू जि.परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी अभियानाला शुक्रवारी, १६ सप्टेंबर रोजी उत्साहात सुरुवात झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षसंघटना मजबूत करण्यावर अधिकाधिक भर द्यावा. धैर्य आणि संयमाने सर्वसामान्य जनतेची कामे करावीत,असे आवाहन माजी आमदार विजय भांबळे यांनी यावेळी केले.
सभासद नोंदणी अभियानाच्या निमित्ताने सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी आमदार भांबळे बोलत होते. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष विनायक पावडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, पप्पु गाडेकर, कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे, रघुनाथ बागल, अजय डासाळकर, निर्मला लिपणे, मुज्जफरभाई, मजीद बागवान, अज्जू कादरी, इस्माइल शेख, गौसलाला, रामेश्वर गाडेकर आदींची उपस्थिती होती.
भांबळे म्हणाले, ” या अभियानाच्या माध्यमातून शरदचंद्र पवार यांचे विचार तळागळातील शेवटच्या माणसापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही परिस्थितीत धैर्य व संयम ठेवून सर्वसामान्य मजूर, कष्टकरी, शेतकरी यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी जोमाने काम करावे. शेती, वीज, पाणी, आरोग्य सुविधा, मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सजग राहावे. सर्वांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.” राजेंद्र लहाने विनायक पावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक सुधाकर रोकडे यांनी केले, सूत्रसंचालन दत्ता तांबे यांनी केले. कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार विजय भांबळे म्हणाले, ” या अभियानाच्या माध्यमातून शरदचंद्र पवार यांचे विचार तळागळातील शेवटच्या माणसापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही परिस्थितीत धैर्य व संयम ठेवून सर्वसामान्य मजूर, कष्टकरी, शेतकरी यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी जोमाने काम करावे. शेती, वीज, पाणी, आरोग्य सुविधा, मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर राहावे.