मराठवाडा मुक्ती दिन : रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
डिग्रस येथील नवयुवक मित्र मंडळाच्या पुढाकार, ४५ जणांनी केले रक्तदान
सेलू जि.परभणी : मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त सेलू तालुक्यातील दिग्रस जहांगीर येथे शुक्रवारी, १६ सप्टेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४५ जणांनी रक्तदान केले. नवयुवक मित्र मंडळाच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी सेलू तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी.चौधरी, पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर धायडे, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयचे रक्त संक्रमण अधिकारी राजकुमार पितळे, प्रतिष्ठीत व्यापारी मधुकरनाना पौळ, एकनाथराव पौळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.चौधरी यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. शिबिरासाठी विष्णु पौळ बाबा पौळ, कृष्णा पौळ, सुदाम पौळ, माऊली, संतोष पौळ, संपत पौळ, भास्कर पौळ, राहुल पौळ, गोविंद पौळ, गोपाळ पौळ, सिद्दु पौळ, किसन पौळ, कृष्णा गोंडगे, नारायण पौळ, रामेश्वर पौळ, योगेश पौळ, विनोद दिग्रसकर, राम पौळ, अजिंक्य पौळ, दत्ता पौळ, ज्ञानेश्वर पौळ आदींनी सहकार्य केले.