दीपस्तंभ : सेलूतील सात शिक्षकांना ‘उपक्रमशील शिक्षक’ पुरस्कार
आमदार मेघना बोर्डीकर यांची माहिती, लवकरच समारंभपूर्वक वितरण
जिंतूर : जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यात आपल्या सेवा काळात उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य करणार्या शिक्षकांना परभणी येथील दीपस्तंभ प्रतिष्ठानकडून दिले जाणारे २०२२-२३ या वर्षातील ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी ही माहिती दिली. आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान : बळीराम कदम (पूर्णा), ज्ञानोबा पातळे (पालम), नामदेव वैद्य (गंगाखेड), संतोष दिवटे (सोनपेठ), दशरथ मुंडे (मानवत), भारत शहाणे (परभणी), सुरेश खरात (पाथरी), जिंतूर तालुक्यातील संतोष सकनूर (कावी), रत्नमाला शेळके (गणपूर), अनिल बसुळे (बोर्डी), कैलास झाडे (येसेगाव), गोविंद कांदे (सोरजा), अब्दुल खलील अब्दुल सलीम (जिंतूर), सेलू तालुक्यातील विकास कदम (देऊळगाव गात), सुधाकर कटारे (तिडी पिंपळगाव), गंगा भानुदास भोरकडे (राव्हा), डिगांबर रोकडे (केमापूर), राजेश्वर बावणे (म्हाळसापूर), अमोल श्रीखंडे (चिकलठाणा), मो.जुबेर मो.अनिस अन्सारी (वालूर) या शिक्षकांना जाहीर करण्यात आला असून लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे कार्य करणार्या शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कारांचा हेतू आहे. उपक्रमशील शिक्षक पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. गुरुंचा सन्मान आपला सन्मान असतो! आमची दीपस्तंभ टीम विविध सामाजिक उपक्रम घेत आलेली आहे. कृषि, पाणलोट, पर्यावरण, वृक्षारोपण, सार्वजनिक साफसफाई, महिलांचे आरोग्य, शालेय महाविद्यालयीन शिक्षण आदी विविध विषयांवर आम्ही मूलभूत काम करत आहोत. शिक्षकांचा सन्मान हा त्या घराचा, गावच्या शाळेचा, संबंधित तालुका, जिल्ह्याचा सन्मान असतो. आमचा खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत. पुरस्कार निवड समितीने ही निवड केली आहे, अशी माहिती आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सेलू तालुक्यातील विकास कदम (देऊळगाव गात), सुधाकर कटारे (तिडी पिंपळगाव), गंगा भानुदास भोरकडे (राव्हा), डिगांबर रोकडे (केमापूर), राजेश्वर बावणे (म्हाळसापूर), अमोल श्रीखंडे (चिकलठाणा), मोहंमद जुबेर मोहंमद अनिस अन्सारी (वालूर) या शिक्षकांना आमदार उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.