कर्तृत्वाला सलाम : जयप्रकाश बिहाणी, ललिता गिल्डा यांना माहेश्वरी सभेचे पुरस्कार प्रदान 

कर्तृत्वाला सलाम : जयप्रकाश बिहाणी, ललिता गिल्डा यांना माहेश्वरी सभेचे पुरस्कार प्रदान 

सेलू येथील कर्तृत्वांचा इचलकरंजी येथील शानदार सोहळ्यात गौरव, सेलूकरांचीही समारंभाला मोठी उपस्थिती  

कर्तृत्वाला सलाम : जयप्रकाश बिहाणी, ललिता गिल्डा यांना माहेश्वरी सभेचे पुरस्कार प्रदान 

सेलू ( जि.परभणी) : येथील प्रसिद्ध उद्योजक, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बद्रिनारायणजी बिहाणी यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘महेश भूषण’ पुरस्कार, तर सेलू महिला मंडळाच्या सचिव ललिता राजेंद्र गिल्डा यांना ‘विशेष कार्य सेवा ‘ पुरस्कार शनिवारी (१७ सप्टेंबर) प्रदान करण्यात आला.

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) येथील घोरपडे नाट्यगृहात हा गौरव सोहळा संपन्न झाला. या वेळी अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्यामसुंदर सोनी, महामंत्री संदीप काबरा, अशोक बंग, सुरेंद्र मानधना, श्रीकिशन भन्साळी आणि पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ढालेगाव (ता.पाथरी) येथील समर्थ वेद विद्यालय, महर्षि वेद व्यास प्रतिष्ठान, सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, तसेच श्रीबालाजी मंदिर संस्थान, कापूस प्रक्रिया व कृषीपूरक उद्योग ह्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. सेलू शहर स्वच्छता, शैक्षणिक, सामाजिक,औद्योगिक विकासात जयप्रकाश बिहाणी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ललिता गिल्डा ह्या सेलू महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्यविषयक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत आहेत. ह्या कार्याची दखल घेवून माहेश्वरी सभेतर्फे सन्मान करण्यात आला. 

जयप्रकाश बिहाणी यांचा ढालेगाव (ता.पाथरी) येथील समर्थ वेद विद्यालय, महर्षि वेद व्यास प्रतिष्ठान, सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, तसेच श्रीबालाजी मंदिर संस्थान, कापूस प्रक्रिया व कृषीपूरक उद्योग ह्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. सेलू शहर स्वच्छता, शैक्षणिक, सामाजिक,औद्योगिक विकासात बिहाणी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ललिता गिल्डा ह्या सेलू महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्यविषयक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत आहेत. ह्या कार्याची दखल घेवून माहेश्वरी सभेतर्फे सन्मान करण्यात आला. 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!