केंद्रप्रमुखांचा निर्धार : ३० टक्क्यांतून पदोन्नतीसाठी राज्यव्यापी लढा तीव्र करणार
औरंगाबाद येथील राज्यस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा, केंद्रप्रमुखांची मोठी उपस्थिती
औरंगाबाद : पदोन्नतीसाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार केंद्रप्रमुख संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद येथील परमानंद शाळेच्या सभागृहात रविवारी (१८ सप्टेंबर) केंद्रप्रमुख संघटनेची राज्यस्तरीय बैठक झाली.
अध्यक्षस्थानी अपंग कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्य सहसचिव माधव लोलमवाड, मार्गदर्शक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील जेष्ठ विधीज्ञ ॲड.बी.व्ही.ठोंबरे, ॲड. डी.बी.नरवडे, एम.एस.साळवे, शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष मधुकर काठोळे, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख असोसिएशनचे राज्य अध्यक्ष राजेंद्र चौधरी, अरुण मडके, अशोक महाले साहेब, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनांचे राज्य अध्यक्ष उमेश गोदे, औरंगाबाद येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख एस.आर.कुलकर्णी, देविदास सूर्यवंशी सुभाष शिंदे, बालाजी पुपले, एम.बी.सुरडकर, नारायण भुजाडे, एफ.एस.तडवी, एन.एम. ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ॲड.बी.व्ही.ठोंबरे, ॲड. डी.बी.नरवडे, होळकर, भुसांगे, श्रीमती कुलकर्णी, बाबासाहेब तरवटे, सुभाष शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण या पदांच्या मागण्या संदर्भात २६ जुलै २०२२ रोजी शालेय शिक्षण विभागातील उपसचिव व अधिकार्यांची सभा झाली. त्यामध्ये केंद्रप्रमुख पद जिल्हा तांत्रिक सेवा ‘क’ मध्ये समाविष्ट करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे पदोन्नतीने ३० टक्क्यांतून भरल्या जाणार्या गटशिक्षणाधिकारी, उप शिक्षणाधिकारी व तत्सम पदावर केंद्रप्रमुख पदोन्नती मिळणार नाही. हे स्पष्ट आहे. कारण गटशिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी अगर तत्सम पदे पदोन्नतीने महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ‘क’ व जिल्हा तांत्रिक सेवा ‘क’ या मधूननच पदोन्नतीने ३० टक्के पदे भरली जातात. त्यामुळे शिक्षण विभागाने आपला पदोन्नतीचा मार्गच बंद केला आहे, हे स्पष्ट झाले आहे. परंतु; आपल्या पदाच्या सेवा प्रवेश नियमावलीत बदल करता येईल का ? तसेच महाराष्ट्र विकास सेवेत या पदास पदोन्नती देता येईल का ? याबाबत पडताळणी करावी, असेही निर्देश सचिवांनी दिलेले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामविकास विभागात सहाय्यक गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व या पदास तत्सम असणारी पदं ही सेवा वर्ग २ मध्ये येतात. या पदांवर पदोन्नतीने ३० टक्के पदे जिल्हा सेवा ‘क’ मधून भरली जातात. केंद्रप्रमुख पदही जिल्हा सेवा ‘क’मध्ये आहे.जिल्हा सेवा ‘क’ मधून पदोन्नती महाराष्ट्र विकास सेवेत देता येईल याची पडताळणीबाबत शासन सुचवित आहे. असा बदल झालाच तर उत्तमच आहे. परंतु; कोर्ट निकालाने विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख ही पदज समकक्ष आहेत. हे स्पष्ट केले आहे. ही पदे शिक्षण विभागातील आहे. न्यायालयाने असे म्हटल्याने केंद्रप्रमुख पदास जिल्हा तांत्रिक सेवा ‘क’ चा दर्जा आपोआप प्राप्त होतो. पद समाविष्ट नसेल, तर शासनाने समाविष्टबाबत कार्यवाही करावी. सर्व केंद्रप्रमुखांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे किंवा सर्व केंद्रप्रमुखांचे पद विस्तार अधिकारी पदामध्ये समायोजित करावीत, या साठी लढा तीव्र करणे आवश्यक आहे, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. प्रास्ताविक बालाजी पुपले, सूत्रसंचालन देवानंद वाघमारे यांनी केले.
निकालाद्वारे न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे केंद्रप्रमुख पदास जिल्हा तांत्रिक सेवा ‘क’ चा दर्जा आपोआप प्राप्त होतो. पद समाविष्ट नसेल, तर शासनाने समाविष्टबाबत कार्यवाही करावी. सर्व केंद्रप्रमुखांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे किंवा सर्व केंद्रप्रमुखांचे पद विस्तार अधिकारी पदामध्ये समायोजित करावीत, या साठी लढा तीव्र करणे आवश्यक आहे,