संस्थाचालक महामंडळ : प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटित लढ्याची गरज
सेलू येथे संस्थाचालक महामंडळाची बैठक, संस्थाचालकांची उपस्थिती
सेलू जि.परभणी : नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू येथे संस्थाचालक महामंडळाची बैठक २० सप्टेंबर रोजी संपन्न झाली. शैक्षणिक संस्थांनी तालुका व जिल्हा पातळीवर संघटित झाल्याशिवाय शैक्षणिक संस्था व शाळांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे मत या व्यक्त करण्यात आले.
सांगली येथे दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य अधिवेशनात, राज्यातील संस्थाचालकांनी उपस्थित राहून प्रश्न लेखी स्वरूपात मांडावेत, आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे सरकार्यावाह माजी आमदार विजय गव्हाणे यांनी यावेळी केले.
जिल्हा कार्याध्यक्ष उदय देशमुख यांनी संस्थेच्या विविध प्रश्नांबाबत विचार व्यक्त केले. श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनीही या वेळी विचार मांडले. जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ कार्याध्यक्ष उदय देशमुख, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, चिटणीस डॉ.व्ही.के.कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, श्रीराम प्रतिष्ठान संस्था अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव साईराज बोराडे, पांडुरंग शिक्षण संस्थेचे प्रल्हाद बोराडे, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने,रामप्रसाद गोरे, गिरीश लोडाया, गणेश माळवे आदींची उपस्थिती होती.